Home क्राईम परिचारिका तरुणीची विषारी औषधाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या; प्रियकरावर गुन्हा

परिचारिका तरुणीची विषारी औषधाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या; प्रियकरावर गुन्हा

Pune Crime: खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकेने विषारी औषधाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस.

Nurse commits suicide by injecting poison A crime against a lover

पुणे:  खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकेने विषारी औषधाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रियकराने मोटार घेण्यासाठी परिचारिक युवतीकडे पैशांची मागणी तसेच मारहाण करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली. त्यानंतर पोलिसांनी प्रियकराच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

अश्विनी देवीदास राठोड (वय २१, रा. धानोरी) असे आत्महत्या केलेल्या परिचारिक युवतीचे नाव आहे. या प्रकरणी प्रियकर बापू किसन मैद (वय २२, रा. छत्रपती संभाजीनगर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अश्विनीचे वडील देवीदास राठोड (वय ५४, रा. चिखलठाणा, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, आरोपी किसन मैद आणि अश्विनी राठोड यांनी कन्नड येथील एका संस्थेतून परिचारिक अभ्यासक्रम पूर्ण केला होता. दोघांचे प्रेमसंबंध होते. त्यानंतर दोघे जण पुण्यात नोकरीसाठी आले. अश्विनी लोहगाव भागातील एका खासगी रुग्णालयात परिचारिका होती. किसनने तिच्याकडे नवीन दुचाकी घेण्यासाठी पैशांची मागणी केली होती. अश्विनीने नकार दिल्यानंतर त्याने तिला मारहाण करण्यास सुरूवात केली. तो तिला शिवीगाळ करुन त्रास देता. किसनच्या त्रासामुळे अश्विनीने विषारी औषधांची इंजेक्शन टोचून घेतले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. अश्विनीचा प्रियकर किसन याच्या त्रासामुळे तिने आत्महत्या केल्याचे वडील देवीदास राठोड यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर या प्रकरणी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक साळवी अधिक तपास करत आहेत.

Web Title: Nurse commits suicide by injecting poison A crime against a lover

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here