Home क्राईम संगमनेर: दिराकडून विधवा भावजयीला मारहाण तिघांविरूध्द गुन्हा दाखल

संगमनेर: दिराकडून विधवा भावजयीला मारहाण तिघांविरूध्द गुन्हा दाखल

Sangamner Crime:  विधवा भावजयीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन दिराने तिला मारहाण केल्याची घटना, सासू सासरे यांनी तिला घरातून काढून दिल्याने तिघांविरुद्ध गुन्हा.

Crime has been registered against three people for beating widow brother-in-law from Dira

संगमनेर:  विधवा भावजयीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन दिराने तिला मारहाण केल्याची घटना शहरातील पद्मा नगर परिसरात घडली. सासू सासरे यांनी तिला घरातून काढून दिल्याने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील पद्मा नगर परिसरात  ३१ वर्षीय विधवा आपल्या मुलीसह राहते. या घरात तिची सासू सरिता, सासरे निवृत्ती सयाजी बुरुंगले हे सुद्धा राहतात. सदर महिलेच्या पतीचे गतवर्षी निधन झाले. त्यानंतर सदर विधवा महिला आपल्या मुलीसह मनमाड येथे आई- वडिलांकडे राहण्यासाठी गेली. ऑक्टोबर २०२२ मध्ये ती पुन्हा संगमनेर येथे सासू-सासरे यांचेकडे राहण्यास गेली. तु पुणे येथे जाऊन नोकरी कर, असे तिला सासू-सासऱ्यांकडून सांगण्यात आल्याने मुलीस त्यांचे जवळ ठेवून पुणे येथे खाजगी रुममध्ये राहण्यास गेली. तेथे खाजगी क्लास करून सदर महिलेने नोकरीचा शोध घेतला. सदर ठिकाणी नोकरी न मिळाल्याने व सासू सासऱ्याने पैसे पाठविणे बंद केल्याने सदर महिला पुन्हा सासु सासऱ्यांकडे आली. तिने लग्नातील दागिने सासू सासरे यांचेकडे मागितले असता तु पैसे आणले तरच तुला येथे राहु देऊ, असे त्यांनी सांगितले. दिनांक २३ एप्रिल रोजी दीर सतीष निवृती बुरुगुले याने घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन सदर महिलेस तु येथुन निघुन जा नाहीतर तुम्हाला दोघींना कुठे गायब करीन तुम्हाला कळणार नाही असे म्हणून दिराने तिला जिवे मारण्याची धमकी दिली.

पुण्यातील सर्व सामान दि. ३ मे रोजी खाजगी टेम्पोने संगमनेर येथे घरी आणल्याचा राग आल्याने सासू-सासरे यांनी हे सामान घराबाहेर फेकून सदर महिलेसोबत भांडण केले. लाथाबुक्क्याने मारहाण करुन घराबाहेर काढून दिले. यानंतर सदर महिलेने शहर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी तिचा दीर, सासू व सासरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Crime has been registered against three people for beating widow brother-in-law from Dira

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here