Home क्राईम इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर कोर्टात पीसीपीएनडीटी अंतर्गत गुन्हा दाखल

इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर कोर्टात पीसीपीएनडीटी अंतर्गत गुन्हा दाखल

संगमनेर: इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टात पीसीपीएनडीटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैद्यकीय अधिक्षक डॉ. भास्कर भवर यांच्याकडून इंदोरीकर महाराजांविरोधात संगमनेर प्रथम न्यायदंडाधिकार्‍यांकडे १९ जूनला खटला दाखल करण्यात आला. इंदोरीकर महाराजांविरोधातील पहिली सुनावणी २६ जूनला होणार आहे.

स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो आणि विषम तिथिला झाला तर मुलगी होते, आणि अशुभ तिथिला झाला तर संतती रंगडी व बेगडी जन्माला येते असे वक्तव्य निवृत्ती देशमुख महाराज यांनी आपल्या किर्तनात केले होते. हे वादग्रस्त विधान इंदोरीकर महाराज यांनी आपल्या कीर्तनातून वेळोवेळी केले होते. या वक्तव्यावर अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि पीसीपीएनडीटी कायद्याच्या समर्थकांनी आक्षेप घेतला होता. तृप्ती देसाई यांनी आक्षेप घेत वाद चिघळला होता.

विधानावरून इंदुरीकर यांनी पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम २२ चे उल्लंघन असल्याचा आरोप करत अहमदनगर इथल्या पीसीपीएनडीटी च्या सलागर समितीच्या सदस्यांनी त्यांना नोटीस पाठवली होती.

यावर इंदुरीकर महाराज यांनी आपल्या वकिलांन मार्फत बाजू मांडण्यात आली होती. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या रंजना गावंदे यांनी प्रशासनाने गुन्हा दाखल न केल्यास तुम्हालाही दोषी धरण्यात येईल अशी नोटीस दिली होती.

त्यामध्ये इंदोरीकर महाराज यांच्या वादग्रस्त विधानानंतर संगमनेर आरोग्य विभागाच्या पीसीपीएनडीटी कायद्याच्या समुचित प्राधिकार्‍यांनी यासंदर्भातील योग्य पुरावे जमा करून न्यायालयात खटला दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केले होती. इंदोरीकर महाराजांविरोधातील पहिली सुनावणी २६ जूनला होणार आहे.

Website Title: Indorikar Maharaj Crime Registered

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here