Home अहमदनगर संगमनेर: मंडलाधिकारी यांना गाडीतून ओढून धमकी व मारहाण

संगमनेर: मंडलाधिकारी यांना गाडीतून ओढून धमकी व मारहाण

संगमनेर: संगमनेर तालुका करोना पार्श्वभूमीवर चांगलाच गाजत आहे. त्याचप्रमाणे प्रशासकीय अधिकारी यांना धमकी व मारहाण करण्याचे प्रमाणही वाढत आहे.

मंडलाधिकारी यांना धमकी देण्याचा व मारहाण करण्याचा प्रकार काल तालुक्यातील घारगाव शिवारात रस्त्यावर घडला आहे.

याप्रकरणी मंडलाधिकारी बाबासाहेब किसन दाताखिळे यांनी घारगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर गणपत बर्डे, संपत गणपत बर्डे, उषा गणपत बर्डे, गणपत गोमा बर्डे सर्व रा, संगमनेर यांच्या विरोधात घारगाव पोलिसांत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंडलाधिकारी यांनी फिर्यादीत म्हंटले आहे की, मी व साक्षीदार यांनी आरोपींना त्यांची नावे विचारली असता त्या कारणावरून संगनमताने गाडीतून ओढून धक्काबुकी करून शिवीगाळ व दमदाटी केली.

तसेच तुमच्यावर विनयभंगाचा व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू असे म्हणत आत्महत्या करण्याची धमकी देऊन सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक बोरसे हे पुढील तपास करीत आहेत.

Website Title: News District Magistrate was threatened and beaten

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here