Home महाराष्ट्र इंदुरीकर महाराजांनी पुन्हा एकदा केलं वादग्रस्त वक्तव्य

इंदुरीकर महाराजांनी पुन्हा एकदा केलं वादग्रस्त वक्तव्य

Indurikar Maharaj once again made a controversial statement

अकोला :  प्रसिद्ध किर्तनकार व समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराज (Indorikar Maharaj)  यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करत  अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. यावेळी  इंदुरीकर महाराजांनी युट्यूबर्सवर टीका केली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी इंदुरीकर महाराजांचे कीर्तन अयोजित केले होते. यावेळी  त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्यं केलं आहे.  वादग्रस्त वक्तव्यांवरुन इंदुरीकर महाराज यापूर्वीही अनेकदा वादात अडकले आहेत

आपल्या कीर्तनाच्या व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करुन 4000 लोक कोट्यधीश झाली आहे, या लोकांमुळेच आपण अडचणीत आलो असून अशांची मुलं दिव्यांग जन्माला येतील असे वादग्रस्त वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी अकोल्यात केले आहे. माझ्याच किर्तनाच्या क्लिप बनवून मलाच कोर्टात खेचलं. यांचं वाटोळच होणार यांचं कधीच चांगलं होणार नाही असे देखील ते म्हणाले.

Web Title: Indurikar Maharaj once again made a controversial statement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here