Home महाराष्ट्र धक्कादायक: पेढा खाऊ घालून बलात्कार, अश्लील व्हिडियो बनवत वेश्याव्यवसायास भाग पाडले

धक्कादायक: पेढा खाऊ घालून बलात्कार, अश्लील व्हिडियो बनवत वेश्याव्यवसायास भाग पाडले

Rape and forced her into prostitution by making pornographic videos

औरंगाबाद | Aurangabad Rape Crime: महिलेवर झालेल्या अत्याचाराने औरंगाबाद पुन्हा एकदा हादरले आहे. महिलेकडून वेश्याव्यवसाय (Prostitution Business) करून घेण्यासाठी तिच्यावर चौघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून समोर आली आहे. महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याची घटना घडली आहे. आरोपीने नग्नावस्थेतील व्हिडिओ ( pornVideo) आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. याबाबत महिलेने हिम्मत करून जवाहर नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आले असून दोघे आरोपी फरार आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार  फिर्यादी महिला घटस्फोटीत असून २०११ पासून आपल्या १३ वर्षीय मुलासह एकटी राहते. २०१९ मध्ये पीडिता महिला कार घेण्यासाठी शहरातील एका शोरूम मध्ये गेली होती. त्या ठिकाणी पीडित महिलेची ओळख आरोपी सुशील साध्ये याच्याशी झाली होती. त्याने फायनान्सचे कर्ज मंजूर करण्याच्या नावाखाली पीडित महिलेकडून साडेतीन लाख रुपये कर्ज घेतले होते. यानंतर २७ मे २०१९ रोजी आरोपी सुशील साध्ये हा आपला मित्र अजय मुळे याला घेऊन तिच्या घरी गेला होता.

लोन मंजूर झाल्याचे कारण सांगत महिलेला पेढा खाऊ घातला. हा पेढा खाल्ल्यानंतर महिला बेशुद्ध झाली. पीडित महिलेला शुद्धीवर आल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचे तिच्या लक्षात आले, यानंतर पीडितेने आरोपीकडे दिलेले पैसे परत मागितले तेव्हा आरोपीने पाच लाखाचा चेक दिला पण तो वटला नाही. या संपूर्ण घटनेनंतर आरोपी मुळे आणि साध्ये हे २ जण पुन्हा महिलेच्या घरी गेले आणि मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ (porn Video) व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. यानंतर महिलेच्या एकटेपणाचा फायदा घेऊन महिलेवर वारंवार बलात्कार (Sexual assault) करण्यात आला.

कर्जाचे हप्ते वेळेवर भरले नसल्यामुळे त्या कारणातून आरोपी लोहार आणि रामचंद्र पाटील या अन्य दोघांनी देखील महिलेवर बलात्कार (Rape) केला आहे. इतकेच नाही तर त्यांनी पीडितेला एका ब्युटीपार्लरमध्ये तिच्याकडून वेश्याव्यवसाय (Prostitution Business) करून घेतला. या प्रकरणी महिला चार जणांविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून दोन आरोपींच्या शोधात आहे.

Web Title: Rape and forced her into prostitution by making pornographic videos

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here