Home अहमदनगर चांदा दरोडा व खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक

चांदा दरोडा व खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक

Accused arrested for robbery and murder

नेवासा | Newasa: नेवासा तालुक्यातील चांदा येथे 2 मार्च रोजी दरोडा टाकून तिघांना मारहाण करून सुर्‍याने वार केल्याने  एकाचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. या घटनेतील आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली आहे. सदर आरोपीवर मोक्का गुन्ह्यासह जिल्ह्यात दरोडा व जबरी चोरीचे एकूण 12 गुन्हे दाखल असून 4 गुन्ह्यांमध्ये तो फरार होता. त्याला नेवासा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे

याबाबत माहिती अशी की, चांदा येथील कर्डिले वस्तीवर दरोडेखोरांनी येऊन अर्चना कर्डिले यांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून नेले. गंगाधर नामदेव कर्डिले, बापू भाऊसाहेब कर्डिले तसेच ओंकार गंगाधर कर्डिले यांना मारहाण करून सुर्‍याने वार केले. त्यात ओंकारचा मृत्यू झाला. याबाबत सोनई पोलीस ठाण्यात खुनासह (murder and Theft) जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला.

या प्रकरणाचा नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या नेतृत्वाखाली पथक तपास करत होते. तपास करत असताना गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी बाबाखान शिवाजी भोसले रा. कुळधरण रोड, ता. कर्जत येथे विटभट्टीवर काम करत असल्याची खात्रीशीर महिती मिळाल्याने तेथे जाऊन बाबाखान शिवाजी भोसले (वय 45) रा. गोंडेगाव ता. नेवासा जि. अहमदनगर यास अटक केली.

बाबाखान भोसले याने गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी पत्रकात म्हटले आहे. तो मोक्का, दरोडा व जबरी चोरी अशा चार गुन्ह्यांत फरार होता.

Web Title: Accused arrested for robbery and murder

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here