Home अहमदनगर अहमदनगर: सिमेंटचा ट्रक व कारचा भीषण अपघात- Accident

अहमदनगर: सिमेंटचा ट्रक व कारचा भीषण अपघात- Accident

Ahmednagar Accident: सिमेंटचा ट्रक आणि वॅगनार गाडीचा अपघात, पती पत्नीसह मुलगा जखमी : सौताडा घाटातील घटना.

Jamkhed A terrible accident involving a truck and a car

जामखेड: सिमेंटचा ट्रक आणि वॅगनार गाडीचा जामखेड सौताडा घाटामध्ये अपघात झाला. तब्बल तीन तासानंतर गाडीमध्ये अडकलेल्या जखमींना जेसीबी व क्रेनच्या साह्याने बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.

महेश विद्यासागर देशमुख, मंजू महेश देशमुख व त्रिवि महेश देशमुख (सर्व रा. बीड) असे तिघेजण जखमी झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवार दि. २ ऑगस्ट रोजी रात्री साडेआकराच्या सुमारास सौताडा घाटातील देवीच्या मंदिराच्या खाली (एमएच ४४ (१९४४) हा सिमेंट भरलेला ट्रक व वॅगनार (एमएच १२ ईएस ८१६१) यांचा खड्ड्यामुळे अपघात होते. हा अपघात इतका भीषण होता की, वॅगनार गाडीवर सिमेंटची गाडी पडल्याने गाडीतील चालक तब्बल तीन तास गाडीत अडकले होते.जेसीबी व क्रेनच्या सहायाने दोन्ही वाहने बाजूला करून कारचे दरवाजे तोडून तीन तास शर्तीच्या प्रयत्नाने त्यांना बाहेर काढले व जामखेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यांना डोक्याला मार लागला आहे. यावेळी ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्याने मोठी मदत केली.

Web Title: Jamkhed A terrible accident involving a truck and a car

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here