संगमनेरमध्ये करुणा मुंडे विरोधात गुन्हा दाखल, धनंजय मुंडेविरोधात पक्ष काढण्यासाठी….
Sangamner Crime: करुणा मुंडे फसवणूक प्रकरण वेगळे वळण, करुणा विरोधात गुन्हा दाखल.
संगमनेर: संगमनेरमधील करुणा मुंडे प्रकरणाचे वेगळे वळण समोर आले आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यकर्त्या करुणा मुंडे यांची 30 लाख रुपयांना फसवणूक केल्याचे प्रकरणी समोर आले होते. याबाबत त्यांनी तक्रार दाखल केली होती पण, आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. करुणा शर्मा यांच्याविरोधातही गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
संगमनेरमध्ये करूणा मुंडे (Karuna Mundhe) यांच्याविरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक फसवणुकीसह (Fraud) धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात नवा पक्ष काढण्यासाठी फिर्यादीकडून लाखो रुपये घेतल्याचा आरोप करुणा शर्मा यांच्यावर करण्यात आला आहे. २२ लाख ४५ हजार रोख आणि १२ लाखांचे सोने घेतल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. उसनवारी म्हणून दिलेली रक्कम आणि सोने परत दिले नाही म्हणून गुन्हा दाखल केला आहे. संगमनेर तालुक्यातील कोंची येथील फिर्यादी भारत भोसले यांनी हा आरोप केला आहे. भोसले यांच्या फिर्यादीवरून ४२०, ५०६ कलमान्वये करुणा शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ७ जानेवारी ते २५ फेब्रुवारी २०२२ दरम्यान व्यवहार झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
काही दिवसांपूर्वी करुणा मुंडे यांनी देखील भारत भोसले यांच्या विरोधात ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद दिली होती. संगमनेर पोलीस ठाण्यात भोसलेंविरोधात ऑगस्ट महिन्यात तक्रार दाखल केली आहे. आमच्या कंपनीत पैसे गुंतवा, दुप्पट करून देतो असे सांगून भोसले आणि इतर दोघांनी फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
त्यामुळे करुणा मुंडे (Karuna Mundhe)यांनी संबंधितांकडे या पैशांबाबत विचारणा केली असता त्याने मुंडे यांना उडवाउडवीचे उत्तरे दिली. इतकेच नव्हे तर खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची आणि बदनामी करण्याची धमकीही दिली, असे करुणा मुंडे यांनी आपल्या फिर्यादित म्हटले आहे.
Web Title: Crime has been registered against Karuna Munde in Sangamner