Home अहमदनगर जामखेडला चोरटयांच्या मारहाणीत पती-पत्नी जखमी ७५ हजार रुपयांची रोकड लंपास

जामखेडला चोरटयांच्या मारहाणीत पती-पत्नी जखमी ७५ हजार रुपयांची रोकड लंपास

जामखेडला चोरटयांच्या मारहाणीत पती-पत्नी जखमी ७५ हजार रुपयांची रोकड लंपास

जामखेड :जामखेड तालुक्यातील धोत्री येथे सात ते आठ चोरटयांनी जाधव वस्ती येथे पती-पत्नी सत्तुरसारख्या धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले. या घटनेत चोरटयांनी ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पती अजिनाथ निवृत्ती जाधव व पत्नी नर्मदा अजिनाथ जाधव (रा. जाधव वस्ती, धोत्री) हे देाघे या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रात्री नगर येथे उपचारासाठीर दाखल केले आहे. याबाबत चार अज्ञात चोरांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You May Also LikeDeepika Padukone Ranveer Singh Marriage Date

याबाबत पोलिस सुत्रांकडुन मिळालेली माहिती अशी की, जामखेड शहरापासुन जवळच धोत्री गावात सोमवारी दि.२७ रोजी रात्री ११.३० फीर्यादी अजिनाथ जाधव हे आपल्या कुठुंबासमवेत झोपले होते. तर जखमी पती-पत्नी हे घरातील पडवीत झोपले होते. यावेळी चार अज्ञात चोरटयांनी घरात घुसुन त्यांना लाकडी दांडक्याने व धारदार शस्त्राने जबर मारहाण केली. तसेच घरातील दोन्ही खोल्यामधील सामानाची उचकापाचक करुन सामान अस्ताव्यस्त फेकुन दिले. चोरटयांनी घरातील कपाटातील सोन्याचे दागिने व मोबाइल असा एकुण ७४ हजार रुपनयांची ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला . तसेच महिलेस लाथाबुक्क्यांनी  मारहाण केली. यावेळी औताच्या पासने तोंडावर डोक्यावर वार केल्याने अजिनाथ जाधव व नर्मदा जाधव हे पती-पत्नी गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे तातडीने हलवण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यंनी भेट दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे करत आहेत.


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here