Home अहमदनगर तलवार बाळगणाऱ्याची पोलिस व होमगार्डला दमदाटी करत धक्काबुक्की

तलवार बाळगणाऱ्याची पोलिस व होमगार्डला दमदाटी करत धक्काबुक्की

तलवार बाळगणाऱ्याची पोलिस व होमगार्डला दमदाटी करत धक्काबुक्की

अहमदनगर: माळीवाडा बसस्थानकात विनापरवाना बेकायदेशीररित्या धारदार शस्त्र बाळगणाऱ्या युवकाची चौकशी करणाऱ्या पोलिस व होमगार्डला दमदाटी करम धक्काबुक्की केल्याची घटना मंगळवारी (दि.२८) पहाटेच्या सुमारास सव्वातीन वाजता घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

You May Also LikeDeepika Padukone Ranveer Singh Marriage Date

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना गुप्त माहितीगाराकडून माहिती कमळाली की माहीवाडा बसस्थानकात प्रवाशी बसतात तेथील बाकड्याजवळ एक संशयीत युवक वावरत असून त्यांच्याकडे तलवारीसारखे हत्यार आहे त्याच्याकडून प्रवाशांना धोका होऊ शकतो. तुम्ही आता आले तर तुम्हाला तो हत्यारासह मिळून येईल. अशी माहिती मिळताच पेट्रोलिंग गस्त करणारे पो.कॉ. संदीप हेमंत थोरात व होमगार्ड बोट हे पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील यांच्या सुचनेवरुन माहीवाडा बसस्थानकात आले.त्यांना बाकड्यावर एक २६ वर्षीय तरुण बसलेला आढळून आला. त्याची विचारणा केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली आणि पो.कॉ. थोरात व होमगार्ड बोटे यांच्याशी हुज्जत घालू लागला. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यावर त्या युवकाने अरेरावी करीत थोरात व बोटे यांना मारुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याचा पाठलाग करुन पकडले व त्याच्याकडून एक तलवार जप्त केली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी पो.कॉ. संदीप थोरात यांच्या फिर्यादिवरुन भारतीय हत्यार कायदा व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे.


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here