लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवरी गायब, लग्न करून लुबाडणारी टोळी जेरबंद
कर्जत | Karjat: लग्नाचे नाटक करून लुबाडणारी टोळी कर्जत पोलिसांना जेरबंद करण्यात यश आले आहे. या गुन्ह्यात दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कर्जत तालुक्यातील एका मोठ्या गावातील एका युवकाला या टोळीने सावज गेले. परभणी येथील टोळी तेथे लग्न जमविण्यासाठी गेले. लग्न जमविले. या लग्नासाठी या टोळीने नवर्या मुलाकडून दोन लाख १० हजार रुपये घेऊन लग्न उरकण्यात आले. आणि काही दिवसांत नवरी मुलीने पोबारा केला. याबाबत मुलाकडील लोकांनी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना याची माहिती दिली. पोलीस निरीक्षक यादव यांनी पथक नेमून परभणी येथे जाऊन या टोळीतील दोन जणांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून साठ हजार रुपये हस्तगत करण्यात आले. यामधील नवरी असणाऱ्या महिलेचे यापूर्वी तीन वेळा लग्न झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली. कर्जत पोलीस ठाण्यात या टोळीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Karjat Marriage gang arrested