Home अहमदनगर Ahmednagar: जिल्ह्यात आठवडे बाजार बंद, लग्नसमारंभासाठी पूर्वपरवानगी

Ahmednagar: जिल्ह्यात आठवडे बाजार बंद, लग्नसमारंभासाठी पूर्वपरवानगी

Ahmednagar market closed in the district pre-approval for wedding ceremony

अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात करोनाने कालच उच्चांकी आकडा पार केल्याने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून लग्न समारंभ व साखरपुडा व धार्मिक समारंभ असल्यास संभंधित पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्याची पूर्व परवानगी घेणे अत्यावश्यक असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जारी केले आहे.

जिल्ह्यात विवाह समारंभास जास्तीत जास्त ५० व्यक्तीना एकत्र येण्याची परवानगी आहे. लग्न समारंभात ५० व्यक्तींपेक्षा जास्त लोक असणे, नियमांचे पालन न करणे, मास्क न वापरणे अशा दुर्लक्ष करणाऱ्या मंगल कार्यालयांवर १० हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे. आता समारंभास पोलीस स्टेशनच्या  प्रभारी अधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक असेल नाहीतर कायदेशीर कारवाईस पात्र राहतील असे या आदेशात स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यातील करोनाच्या संखेत वाढ होत असल्याने गर्दी टाळण्याच्या हेतूने जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार २९ मार्च पासून ते १५ एप्रिल २०२१ पर्यंत बंद ठेवण्यात येणार आसल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहे.    

Web Title: Ahmednagar market closed in the district pre-approval for wedding ceremony

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here