Home अहमदनगर बाळ बोठे विनयभंग प्रकरणी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात

बाळ बोठे विनयभंग प्रकरणी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात

Ahmednagar custody for Bal Bothe molestation case

अहमदनगर: यशस्विनी महिला बिग्रेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे(Bal Bothe) याची पारनेरच्या प्रथमवर्ग न्यायाधीश उमा बोऱ्हाडे यांनी गुरुवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

दरम्यान बोठे यास न्यायालयीन कोठडी मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी न्यायालयात अर्ज दाखल करून कोतवाली पोलीस ठाण्यात असलेल्या महिलेच्या विनयभंग प्रकरणी बोठे याचा ताबा देण्याची मागणी केली.

न्यायालयाने कोतवाली पोलिसांचा अर्ज मंजूर करून बोठेस कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले. बाळ बोठे ज्यावेळी फरार झाला होता त्यावेळी याच्याविरोधात महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. बोठे फरार असल्यामुळे कोतवाली पोलिसांना तो हवा होता. विनयभंगासह इतरही काही गुन्हे कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल आहेत. प्रथमतः त्यास विनयभंग प्रकरणी ताब्यात घेतल्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी सांगितले.

मागील तेरा दिवसांच्या पोलीस कोठडीत बोठे याने दिलेल्या माहितीच्या आधारे अडीच महिन्यात पुरावे संकलित करणार आहे. त्यानंतर बोठे याच्याविरोधात पारनेर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.

Web Title: Ahmednagar custody for Bal Bothe molestation case

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here