Home अहमदनगर जिल्ह्यातील या तालुक्यात जगदंबा देवीची विटंबना केल्याप्रकरणी एकास अटक

जिल्ह्यातील या तालुक्यात जगदंबा देवीची विटंबना केल्याप्रकरणी एकास अटक

Karjat One arrested for defaming Jagdamba Devi

Ahmednagar News Live | Karjat Crime | कर्जत: कर्जत तालुक्यातील राशीन येथील भाविकांचे आराध्य दैवत असणारी श्री जगदंबा देवीची हातवारे करून व चुकीचे बोलून एकाने विटंबना केली असल्याने एकास कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली.

विनय मेघराज बजाज (रा. राशीन ता. कर्जत) असे या व्यक्तीचे नाव आहे. याने बुधवारी सायंकाळी जगदंबा देवीसाठी असणाऱ्या दर्शन रांगेतून न येता विरुद्ध दिशेने मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केला. राज्यभरातील भाविकांचे आराध्यदैवत व श्रद्धास्थान असलेल्या श्री जगदंबा देवीला हातवारे करून चुकीच्या पद्धतीने बोलून, विटंबना करत भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या. त्यामुळे राशीनसह परिसरातील भाविक भक्तांनी रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध व्यक्त केला.

याबाबत अ‍ॅड. सचिन रेणूकर यांच्यासह प्रतिभा सचिन रेणुकर (रा. जगदंबा मंदिराशेजारी राशीन ता.कर्जत) यांनी फिर्याद दाखल केली असून या दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विनय बजाज याच्यावर कलम २९५, २९५ अ, ५०४ प्रमाणे गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. या निंदनीय घटनेने भाविकांनी संताप व्यक्त केला आहे.

Web Title: Karjat One arrested for defaming Jagdamba Devi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here