Home अहमदनगर कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने अहमदनगर प्रशासनाने घेतला महत्वपूर्ण निर्णय

कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने अहमदनगर प्रशासनाने घेतला महत्वपूर्ण निर्णय

Ahmednagar Corona basis important Decision 

Ahmednagar Corona | अहमदनगर: राज्यात कोरोनाचे रुग्णांचे आकडे स्थिर होता दिसून येत आहे नगर जिल्ह्यात यावेळीही रुग्णसंख्या वाढतच आहे. गेल्या तीन दिवसांपासून रुग्णसंख्या काही पटीने वाढीने प्रशासनाची चिंता वाढली आहे. काही काळ रुग्ण वाढणार असल्याचा अंदाज आला असल्याने आता सर्व तालुक्यांतील कोविड केअर सेंटर पुन्हा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत या सूचना दिल्या आहेत.

नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. गुरुवारी १५४४ रुग्णांची वाढ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.४३ टक्क्यांवर घसरलं आहे. नगर शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहे. त्याखालोखाल नगर ग्रामीण, राहाता, पारनेर व श्रीरामपूर या तालुक्यांतही रुग्ण वाढत आहे.

Web Title: Ahmednagar Corona basis important Decision 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here