Home कर्जत ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली चिरडून एकाचा मृत्यू

ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली चिरडून एकाचा मृत्यू

Karjat sugarcane Tractor and motarcycle Accident 

कर्जत | Karjat: तालुक्यातील हिंगणगाव येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची मोटारसायकलला धडक बसून एकाचा मृत्यू झाला आहे. रा. गार ता, श्रीगोंदा येथील अंकुश शेळके याचा मृत्यू झाला आहे. पत्नी सुमन शेळके ही गंभीर जखमी झाली आहे.

कर्जत तालुक्यातील हिंगणगाव शिवारात दोन ट्रॉली एकमेकांना जोडून ट्रॅक्टरमार्फत ऊसाची वाहतूक केली जाते. शेळके यांच्या दुचाकीला ट्रॅक्टरची धडक बसली. यामध्ये अंकुश हा दुचाकीवरून खाली पडून  ट्रॉलीच्या चाकाखाली सापडल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या सोबत असलेल्या पत्नी सुमन ही देखील गंभीर जखमी झाली आही.

दोन ट्रॉली एकमेकांना जोडून ऊस वाहतुकीचे प्रकार वाढले आहे. यामधूनच हा अपघात घडला. ऊसाची अशी वाहतूक करणाऱ्या साधनांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.  जास्तीच्या ऊस वाहतूक करणाऱ्या अशा ट्रक व ट्रॉली यांच्यावर नियंत्रण आणण्याची प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेण्याची गरज आहे.

Web Title: Karjat sugarcane Tractor and motarcycle Accident 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here