हायप्रोफाईल वेश्या व्यवसायावर छापा, एकास ताब्यात
राहुरी | Rahuri : राहुरी शहरातील न्यु भारत या हॉटेलमध्ये हायप्रोफाईल वेश्या व्यावासायावर पोलिसांनी छापा टाकला आहे. डीवायएसपी संदीप मिटके , आयुष नोपाणी, अभिनव त्यागी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
या कारवाईत एका महिलेची सुटका करण्यात आली तर एक आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे.
राहुरी शहरातील हॉटेल न्यु भारत येथे सय्यद फरहाद इर्शाद अहमद रा. राहुरी हा परप्रांतीय महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलीस अधीक्षक मनोज पाटील, प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक अग्रवाल यांच्या मार्गदर्शनावरून श्रीरामपूर विभागाचे डीवायएसपी संदीप मिटके, अभिनव त्यागी व त्यांचे कर्मचारी यांचे पथकाने हॉटेल न्यु भारत येथे बनावट ग्राहक पाठवून शासकीय पंचासमक्ष छापा टाकत तीन पिडीत महिलांची सुटका केली. आरोपी सय्यद फरहाद इर्शाद अहमद रा. राहुरी यास ताब्यात घेतले आहे. या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम राहुरी पोलीस स्टेशनमध्ये सुरु आहे.
Web Title: Raid in high profile prostitution business