जिल्हाधिकाऱ्यांकडून नियमावली जाहीर, मंदिरात नियमांचे पालन अनिवार्य
अहमदनगर: राज्यशासनाने घोषणा केल्यामुळे जिल्ह्यातील मंदिरे, धार्मिक स्थळे १६ नोव्हेंबर पासून सुरु झाली आहेत. मंदिरामध्ये ६५ वर्षावरील व्यक्तीना व १० वर्षाखालील मुलांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.
दोन भाविकांमध्ये ६ फुटांचे अंतर राहील, रांगेचे नियोजन राहील असे आदेश जिल्हाधिकारी डॉ, राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. मास्क वापरणे, शारीरिक अंतर राखणे, सॅनिटायझर वापरणे भाविकांना अनिवार्य करण्यात आले आहे. मंदिरात प्रसादाचे वाटप केले जाणार नाही. फुल, हार, नारळ, अशा वस्तू अर्पण करता येणार नाही. या आदेशात १८ नियमाची नियमावलीचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नियमावली पुढीलप्रमाणे:
कमीत कमी सहा फुटांचे अंतर राखणे
मास्क वापरणे
सॅनिटायझर वारंवार हात धुणे. रांगांमध्ये शारीरिक अंतराच्या खुणा आवश्यक.
हात पाय साबणाने स्वच्छ धुणे बंधनकारक
प्रवेशद्वारावर सॅनिटायझर व्यवस्था.
पुतळे, मूर्ती, ग्रंथ स्पर्श करण्यास मनाई.
आजाराची लक्षणे नसलेल्यांनाच प्रवेश.
मास्क असेल तरच ,मंदिरात प्रवेश. गायन भजन गटांना परवानगी नाही.
अन्नदान करताना नियमांचे पालन आवश्यक
जनजागृतीसाठी ऑडियो, व्हिडियो क्लिप लावणे.
मंदिरातील कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी आवश्यक
पादत्राणे गाडीतच ठेवावीत
अंतरानुसार दर्शनासाठी संख्या निश्चित करणे.
या नियमाचे उल्लंघन केल्यास शंभर रुपये दंड वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पोलीस यंत्रणेला दिले आहेत. धुम्रपान, थुंकणे, मास्क न वापरणे आढळले तर शंभर रुपये दंड करण्यात येणार आहे.
Web Title: Ahmednagar Collector Mandatory observance of rules in the temple