Home अहमदनगर उसाचा ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला खड्ड्यात जाऊन कोसळला

उसाचा ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला खड्ड्यात जाऊन कोसळला

Karjat sugarcane tractor plunged into a ditch on the side of the road

कर्जत | Karjat: ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर रस्याच्या कडेला खड्यात जाऊन अपघात झाल्याची घटना कर्जत तालुक्यातील करमणवाडी येथे घडली. मंगळवारी सकाळी हा अपघात झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर खड्ड्यात जाऊन कोसळल्याची घटना घडली. या अपघातात ट्रॅक्टर चालक गजानन चव्हाण रा. पुसद जि. नांदेड हा सुखरूप बचावला आहे. ट्रॅक्टर हा काळेवाडी देवगाव दोन ट्रोली उस भरून अंबालिका कारखान्याकडे जात असताना उतार असल्याने ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटले. यामध्ये ट्रॅक्टर हा खड्यात जाऊन कोसळला. सुदैवाने चालक हा बचाविला आहे. मात्र या अपघातात ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सध्या जिल्ह्यात ऊस तोड व वाहतुकीचे काम जोरात सुरु आहे. यामध्ये वाहतूक करणारे ट्रॅक्टर ओव्हेरलोड उस भरणे, दोन ट्रोली सोबत नेणे हा प्रकार सुरु असल्याने अशा प्रकारचे अपघात झाल्याचे समोर येत आहे. तरी प्रशासनाने यावर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न करावेत अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.

Web Title: Karjat sugarcane tractor plunged into a ditch on the side of the road

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here