Home अहमदनगर घरफोडीतील पिता पुत्र दरोडेखोर पोलिसांच्या अटकेत

घरफोडीतील पिता पुत्र दरोडेखोर पोलिसांच्या अटकेत

Shrigonda Father and son robber arrested in burglary

श्रीगोंदा | Shrigonda: तालुक्यातील पिसारे खांड शिवारात ८ डिसेंबर रोजी घरफोडीच्या घटनेत १ लाख ३० हजार रुपयाचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या उदाश्या लालश्या  भोसले व अतुल उदाशा भोसले या पिता पुत्र दरोडेखोरांना श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली आहे.

पिंपाळे खांड येथील इंगळे वस्तीवरील घरफोडी ही कोळगाव येथील पिता पुत्राने केली अशी माहिती पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या गुप्त खबर्याकडून मिळाली. यावर कोबिंग ऑपरेशन करण्यात आले. यामध्ये हे पिता पुत्र पोलिसांच्या जाळ्यात अडकले. त्यांच्याकडून ३० हजार किमतीचे सोन्याचे दागिने व एक चाकू जप्त केला आहे.

या पिता पुत्र दरोडेखोरांच्या विरोधात तळेगाव दाभाडे, आळे फाटा, बेलवंडी, पारनेर. नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले गेलेले आहे.

ही कारवाई पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर आणि त्यांचे पोलीस कर्मचारी यांनी केली आहे.   

Web Title: Shrigonda Father and son robber arrested in burglary

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here