Home अहमदनगर अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी जेरबंद

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी जेरबंद

Jamkhed Accused of abusing a minor girl arrested

अहमदनगर | Jamkhed: सातारा तालुक्यातील एका गावात ऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने या आरोपीस सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी शेवगाव तालुक्यातील थाटेवाडी येथील आहे. दिगंबर उद्धव सुपेकर असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, दिगंबर सुपेकर हा ट्रक्टरचालक आहे. तो ऊसतोड मजुरांसोबत राहत होता. संबंधीत मुलीच्या घरच्यांच्या तो ओळखीचा असल्याने तो काही वेळेला रात्री त्यांच्या घराशेजारीच झोपत असे. त्याने शनिवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास त्याने मुलीवर अत्याचार केला. हे प्रकरण मुलीने तिच्या घरच्यांना सांगितले. यावरून पिडीत मुलीने व तिच्या घरच्यांनी फिर्याद दिल्याने दिगंबर सुपेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर या आरोपीस अटक करण्यात आली आहे.

Web Title: Jamkhed Accused of abusing a minor girl arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here