Home अहमदनगर विवाहित तरुणाकडून एका तरुणीस त्रास दिल्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

विवाहित तरुणाकडून एका तरुणीस त्रास दिल्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Ahmednagar Suicide by strangling a lemon tree after harassing a young woman

अहमदनगर | Ahmednagar: नगर शहरातील बोल्हेगाव भागात सीना नदीच्या पात्रालगत रेणुका या १८ वर्षीय अविवाहित तरुणीने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

एका लग्न झालेल्या तरुणाने व तिच्या पत्नीने रेणुकाला त्रास दिल्याने तिने ११ डिसेंबर रोजी पाच वाजेच्या सुमारास आत्महत्या केली.

या पिडीत तरुण मुलीची आई गीता रा. सावेडी नाका, नगर या महिलने तोफखाना पोलिसांत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपी राकेश अशोक बनकर व उज्वला राकेश बनकर रा. बोल्हेगाव गावठाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी राकेश अशोक बनकर याने स्वतः चे लग्न झालेले असताना मुलगी रेणुका हिला माझे तुझ्यावर प्रेम आहे. मी तुझ्याबरोबर लग्न करणार असे म्हणत तिच्याशी लग्न न करता आरोपीने त्रास दिला.

तसेच राकेशची पत्नी उज्वला हिने रेणुका हिला मारहाण करून शिवीगाळ करून आत्महत्या करण्यास भाग पडल्याने या दोघांच्या त्रासाला कंटाळून रेणुका हिने सीना नदीमध्ये लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक मुंढे हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Ahmednagar Suicide by strangling a lemon tree after harassing a young woman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here