Home संगमनेर संगमनेर नाशिक पुणे महामार्गावर होंडा सिटी कारने ऊसाच्या ट्रॅक्टरला  धडक 

संगमनेर नाशिक पुणे महामार्गावर होंडा सिटी कारने ऊसाच्या ट्रॅक्टरला  धडक 

Sangamner Honda city car and sugarcane tractor Accident

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात नाशिक पुणे महामार्गावर गाभणवाडी परिसरात होंडा सिटी कारने उसाच्या ट्रॅक्टरला जोरदार धडक देऊन अपघात घडल्याची घटना घडली आहे. हा अपघात बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडला. अपघातात होंडा सिटी कारचा चालक धीरज देशमुख रा. नागपूर हा गंभीर जखमी झाला आहे.

नाशिक पुणे महामार्गावर गाभणवाडी परिसरात होंडा सिटी कारने उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिली आहे.  कार चालकाने  पाठीमागून जोराची धडक दिली.  कारच्या जखमी चालकाला संगमनेर येथे तांबे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती समजताच पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने चालकाला कारच्या बाहेर काढून रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे, तसेच जखमी धीरज देशमुख यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजले जात आहे. जिल्ह्यात ऊस वाहतूक अपघाताचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे.

Web Title: Sangamner Honda city car and sugarcane tractor Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here