Home पुणे Rape | धक्कादायक! महाविद्यालयीन तरुणीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार

Rape | धक्कादायक! महाविद्यालयीन तरुणीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार

Pune rape Case:  तू आरडाओरडा केला तर तुला येथेच मारून टाकीन अशी धमकी देऊन फिर्यादीवर बलात्कार.

Kidnapped college girl and rape her

पुणे: किरकोळ कारणातील वाद झाला असताना तरुणाने कॉलेजवर येऊन तेथून दुचाकीवरून जबरदस्तीने चाकणला घेऊन जाऊन महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

शेरखान शब्बीर सय्यद वय २५ रा. वारजे माळवाडी याच्यावर डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका महाविद्यालयीन तरुणीने डेक्कन पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. हा प्रकार कर्वे रोडवरील महाविद्यालयापासून चाकण एमआयडीसी येथील वीटभट्टीजवळील एका खोलीत बुधवारी दुपारी घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी शेरखान सय्यद यांच्यात एक महिन्यापूर्वी किरकोळ वाद झाला होता. त्यामुळे फिर्यादी त्यांच्याशी बोलत नव्हत्या. २० जुलै रोजी त्या कॉलेजला गेल्या असताना तो तेथे आला. फिर्यादी यांना तुझ्याशी पाच मिनिटे बोलायचे असे सांगून त्याच्या मित्राच्या दुचाकीवर ते ट्रिपल सीट बाहेर आले. शेरखान याने मित्रास जाण्यास सांगितले. त्यानंतर त्याने फिर्यादी यांना मोटारसायकलवरून चाकण येथे घेऊन गेला. तेथे बंद खोलीत नेले व यावेळी फिर्यादी यांनी विचारणा केली असता तू आरडाओरडा केला तर तुला येथेच मारून टाकीन अशी धमकी देऊन फिर्यादीवर बलात्कार केला. आणि हाताने मारहाण केली. त्यानंतर त्याने फिर्यादी यांना मोटारसायकलवर कॉलेजजवळ आणून सोडून दिले व तेथून पळून गेला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कवटीकर हे करीत आहे.

Web Title: Kidnapped college girl and rape her

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here