Home महाराष्ट्र राज्यात या जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार पाउस, हवामान खात्याचा अंदाज

राज्यात या जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार पाउस, हवामान खात्याचा अंदाज

Rain Alert: मुंबईसह कोकण, नाशिक, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा.

Heavy rain in the state for the next four days in Maharashtra 

मुंबई: जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने दमदार सुरुवात केली. राज्यात मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण केली आहे. तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र आता पुढील चार दिवस मुसळधार पाउस (rain) होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उद्यापासून मुंबईसह कोकण, नाशिक, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा राज्यात पूरस्थिती निर्माण होऊ शकतेरविवारी आणि सोमवारी मराठवाड्यातील जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. या भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे  प्रमाण कमी झाले आहे. आता पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभाने वर्तवला आहे.

तर पुढच्या २४ तासात पालघर, नाशिक, पुणे, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांमध्ये पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा आहे.

रविवारी आणि सोमवारी मराठवाड्यातील जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. या भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे (Rain) प्रमाण कमी झाले आहे. आता पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभाने वर्तवला आहे.

Web Title: Heavy rain in the state for the next four days in Maharashtra 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here