Home क्राईम नांदेड हादरले! एका महिलेचा नको त्या अवस्थेत व्हिडियो बनविला अन घडले असे...

नांदेड हादरले! एका महिलेचा नको त्या अवस्थेत व्हिडियो बनविला अन घडले असे काही..

Nanded Crime News: तरुणाची कोयत्याने सपासप वार करून हत्या (Murder) केल्याची घटना, सचिन मुरलीधर कदम (वय २१) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

Nanded Crime young man was murder to death with a koya

नांदेड: मार्लेगाव येथील एका २१ वर्षाच्या तरुणाची कोयत्याने सपासप वार करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. बोरगाव शिवारातील एका डोहात तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास करीत तीन संशियीत आरोपींना अटक केली आहे.

सचिन मुरलीधर कदम (वय २१) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  मार्लेगाव येथील सचिन हा गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेतात गेला होता. सायंकाळपर्यंत तो घरी परतला नाही. नातेवाईकांनी शेतात आणि गावात सर्वत्र शोध घेऊनही तो आढळून आला नाही. त्यामुळे गावातील ३० ते ४० तरुणांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तिथेही तो आढळून आला नाही.

यानंतर रात्री १० वाजेच्या दरम्यान नदीकाठावरील बोरगाव शिवारातील डोहात सचिनचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मनाठा पोलिसांना मिळाली. सचिनचा मृतदेह बघून पोलिसांनी त्याची हत्या झाली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतलं.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताची कसून चौकशी केली असता चौकशीत संशयिताने आपणच आपल्या साथीदारांसह सचिनचा खून केला असल्याची कबुली दिली. मयत सचिनने नात्यातील एका महिलेचा महिलेचा नको त्या अवस्थेत व्हिडिओ बनवला होता. याचाच राग मनात धरून आरोपींनी सचिनचा कोयत्याने सपासप वार करून खून (Murder) केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक (Arrested) केली आहे.

Web Title: Nanded Crime young man was murder to death with a koya

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here