Home अहमदनगर भर पावसात नेवासा फाटा येथे आदित्य ठाकरे यांचे भाषण, गद्दारी का केली?...

भर पावसात नेवासा फाटा येथे आदित्य ठाकरे यांचे भाषण, गद्दारी का केली? हे……  

Nevasa Aditya Thackeray News: आपण गद्दारी का केली हे लोकांना पटवून द्यावे असे आव्हान युवा नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना केले.

Aditya Thackeray's speech at Nevasa Phata in full rain

नेवासा फाटा: ज्यांचे जगाने कौतुक केले. विकास होत असताना सर्व एकत्र राहत होते कदाचित हे पाहून त्यांच्या पोटात दुखत असेल असा आरोप बंडखोरांवर युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच गद्दारी केली. त्यांना आपण काहीही कमी केले नव्हते. मात्र, त्यांच्यावर यासाठी काही दडपण असेल.

आता त्यांना जेथे राहायचे असेल तेथे त्यांनी आनंदात रहावे. हिंमत असेल तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे. मुख्य म्हणजे आपण गद्दारी का केली? हे लोकांना पटवून द्यावे,’ असे आव्हान शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना दिले आहे.

नेवासा फाटा येथे भर पावसात ठाकरे यांचे भाषण झाले. औरंगाबादचा दौरा आटोपून दुपारी आदित्य ठाकरे यांचे नगर जिल्ह्यात आगमन झाले. नेवासा फाटा येथे युवा नेते उदयन गडाख, शिवसेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे व शिवसैनिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

भर पावसातही मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.ठाकरे म्हणाले, ‘सरकार पडल्यावरही एवढे प्रेम मिळाले, हे पाहून मी भारावून गेलो आहे. सरकार पडल्यानंतर नेवाशात घेतलेली गडाख यांची सभा पाहून मला ताकद आणि हिंमत मिळाली. असेही लोक आपल्यासोबत आहेत.

पडत्या काळात गडाखांनी आम्हाला साथ दिली. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी माझे वडील उध्दव ठाकरे यांना फोन करून धीर दिला. अडीच वर्षांच्या काळात आपल्या सरकारने खूप कामे केली. कोविडमध्ये राज्याची काळजी घेतली.

Web Title: Aditya Thackeray’s speech at Nevasa Phata in full rain

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here