Home धुळे धक्कादायक बातमी! तीन चिमुकल्यांना मृत्यूने गाठले, बाहेर खेळायला जातो असे सांगितले अन…

धक्कादायक बातमी! तीन चिमुकल्यांना मृत्यूने गाठले, बाहेर खेळायला जातो असे सांगितले अन…

Dhule News:  तीन चिमुकले बाहेर खेळण्यासाठी जातो असे सांगून डोहात पोहायला (drowning) गेले अन तिघांना मृत्यूने गाठलं.

drowning Death met three little ones

धुळे: धुळे जिल्ह्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. बाहेर खेळण्यासाठी गेलेल्या तीन चिमुकल्यावर काळाने घाला घातला आहे. साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे तीन चिमुकले बाहेर खेळण्यासाठी जातो असे सांगून डोहात पोहायला गेले अन तिघांना मृत्यूने गाठलं.

डोहाच्या पाण्यात उड्या मारल्यानंतर तिघांना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने त्यांचा  पाण्यात बुडून (drowning) मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर ग्रामस्थांनी या तिघांना पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मयत घोषीत केले. या दुर्देवी घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: drowning Death met three little ones

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here