Home अहमदनगर Accident: मोटारसायकल व टॅकर यांच्यात भीषण अपघात, वडील मुलगी ठार तर मुलगा...

Accident: मोटारसायकल व टॅकर यांच्यात भीषण अपघात, वडील मुलगी ठार तर मुलगा जखमी

Shrirampur Accident News: नायगाव येथील मुलगी जागेवरच चिरडून ठार झाली.

accident between motorcycle and tacker, father and daughter killed and son injured

श्रीरामपूर: शहरानजीक गायकवाड वस्ती येथे मोटारसायकल व मळीचा टॅकर यांच्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात नायगाव येथील मुलगी जागेवरच चिरडून ठार झाली आहे तर वडिलांचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला आहे. मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला नगर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

आज सकाळी 8 वाजता श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथील बाळासाहेब जगन्नाथ गायकवाड (४५), अजित बाळासाहेब गायकवाड (वय 20) व दीपाली बाळासाहेब गायकवाड (वय 18) हे तिघे मोटारसायकलवरुन पढेगावकडे जात असताना शहरानजीकच गायकवाड वस्ती या ठिकाणी दोन मोटारसायकलचा समोरासमोर धडक होवून मुलगी दिपाली मोटारसायकलवरुन पडून बेलापूरकडे जाणा-या एमएच 43 यु 3335 या क्रमांकाच्या मळीच्या टॅकरखाली येवून जागीच ठार झाली.

मोटारसायकलवरील वडील बाळासाहेब व मुलगा अजित गंभीर जखमी झाले. या दोघांना उपचारासाठी श्रीरामपूरातील साखर कामगार रुग्णालयात नेत असताना वडील बाळासाहेब यांचा मॄत्यू झाला. तर मुलगा अजित याचेवर प्राथमिक उपचार करुन त्यास पुढील उपचारासाठी नगर येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मळीचा टॅकर व मोटारसायकल पोलीस ठाण्यात आणले.

Web Title: accident between motorcycle and tacker, father and daughter killed and son injured

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here