Home कोल्हापूर बेपत्ता तरुणी डॉक्टर इंजेक्शन अडकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

बेपत्ता तरुणी डॉक्टर इंजेक्शन अडकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

Kolahapur Young Doctor Suicide: रात्रीपासून बेपत्ता होत्या. रविवारी पहाटे घरानजीक डी मार्ट परिसरात रस्त्येच्या कडेला फुटपाथवर इंजेक्शन अडकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

Kolahapur Young Doctor Suicide found a dead body

कोल्हापूर: ताराबाई पार्कमधील एका तरुणी डॉक्टरने हातात इंजेक्शनद्वारे द्रव्य टोचून घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.  डॉ. अपूर्वा प्रवीणचंद्र हेंद्रे वय ३० असे या तरुणीचे नाव आहे.

याबाबत शाहूपुरी पोलिसांनी माहिती दिली. त्या रात्रीपासून बेपत्ता होत्या. रविवारी पहाटे घरानजीक डी मार्ट परिसरात रस्त्येच्या कडेला फुटपाथवर इंजेक्शन अडकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.  

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, डॉ. अपूर्वा हेंद्रे ह्या सर्जन होत्या, त्या खासगी रुग्णालयात प्रॅक्टिस करता होत्या. शनिवारी सायंकाळी त्या काही कार्यक्रमासाठी बाहेर होत्या, मध्यरात्री घरी परतल्या. काही मिनीटेच घरी थांबून पुन्हा मुख्य दरवाजाला बाहेरुन कडी लावून त्या घराबाहेर पडल्या. त्यांच्या आई – वडीलांना शंका आल्याने त्यांनी पुढील दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण तो न उघडल्याने ते पाठीमागील दरवाजातून बाहेर येऊन त्यांनी अपूर्वाची शोधाशोध केली. तोपर्यत अपूर्वा ह्या गायब झाल्या होत्या.

परिसरात शोधाशोधनंतर पहाटेच्या सुमारास डॉ. हेंद्रे यांनी शाहुपूरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले होते, तोपर्यत ताराबाई पार्कमधील डी मार्ट समोरील रिक्षा स्टॉपशेजारी फुटपाथवर तरुणीचा मृतदेह आढळल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी तिकडे धाव घेतली. डॉ. प्रविण हेंद्रे यांनी तातडीने मुलीला सीपीआर रुग्णालयात दाखल केले, पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू (Death) झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

घटनास्थळी रिक्षा स्टॉपवरील कठड्यावर बसून त्यांनी इंजेक्शन घेतले असावे, त्यानंतर त्यांचा खाली पडून मृत्यू झाला. घटनास्थळी मृतदेहाच्या हातात इंजेक्शन आडकलेल्या अवस्थेत होते असे डॉ. प्रविण हेंद्रे यांनी सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले, त्यांच्या पर्समध्ये दोन इंजेक्शन व एक औषधांची बाटली मिळाली. याबाबत शाहुपूरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Kolahapur Young Doctor Suicide found a dead body

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here