Shankarrao Gadakh: शंकरराव गडाख यांचा राजकीय निर्णय, त्यांची प्रतिक्रिया
Shankarrao Gadakh: शिवसेना पक्षाबाबतची न्यायालयीन लढाई सुरु आहे. निकाल निघाल्यानंतर येणाऱ्या काळात पक्ष आणि पक्षाचं काम स्पष्ट होऊ शकेल अशी प्रतिक्रिया शंकरराव गडाख यांनी दिली आहे.
Shankarrao Gadakh: मी उध्दव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्षाबाबतची न्यायालयीन लढाई सुरु आहे. निकाल निघाल्यानंतर येणाऱ्या काळात पक्ष आणि पक्षाचं काम स्पष्ट होऊ शकेल अशी प्रतिक्रिया शंकरराव गडाख यांनी दिली आहे.
आमदार नाराज होते. काही राजकीय नाराजी असेल, काही कामाच्या बाबतीत असेल. त्या त्या वेळेस उद्धव साहेबांनी मीटिंग घेण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्या आमदारांनी त्यांचा निर्णय घेतला आहे. मी मात्र या अडचणीच्या काळात उद्धव साहेबांसोबत राहिलो आहे. इतकी मोठी नाराज आणि त्यातून इतका मोठा स्फोट होईल याची कल्पना आम्हाला कोणालाच नव्हती. कदाचित उद्धव साहेबांनाही नसावी. परंतु दुर्दैवाने ते झालं. शिवसेना पक्षाबाबतची न्यायालयीन लढाई निकालात निघाल्यानंतरच येणाऱ्या काळात पक्ष आणि पक्षाचं काम स्पष्ट होऊ शकेल, अशी प्रतिक्रिया शंकरराव गडाख यांनी दिली. कालच त्यांनी आपल्याला बोलायचं आहे स्पष्ट केलं होत त्यावर त्यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे.
Web Title: Political decision of Shankarrao Gadakh