Home महाराष्ट्र Accident: शिंदे गटातील या आमदाराच्या गाडीला अपघात

Accident: शिंदे गटातील या आमदाराच्या गाडीला अपघात

Accident: मुंबईतल्या फ्री वे ब्रीजवर वाडीबंदर जवळ आठ गाड्यांची एकमेकांना धडक.

Accident to the car of this MLA from Shinde group

मुंबई: शिवसेना शिंदे गटातील विधिमंडळाचे प्रतोद भरत गोगावले यांच्या गाडीला अपघात (Accident) झाल्याची घटना सकाळी घडली आहे.

मुंबईमधील घाटकोपर ते मंत्रालय दरम्यानच्या फ्री वेवर हा अपघात झाला आहे. गोगावले यांच्या कारला मुंबईतल्या फ्री वे ब्रीजवर वाडीबंदर जवळ आठ गाड्यांची एकमेकांना धडक बसली. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार भरत गोगावले हे सकाळी मंत्रालयात निघाले असताना गाडीचा अपघात झाला. पुढे जाणाऱ्या वाहनाने अचानक ब्रेक मारल्याने वाहनांचा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघातानंतर बोलताना भरत गोगावले यांनी म्हटलं की, आठ गाड्या एकमेकांवर आदळल्या. मात्र कुणालाही काहीही दुखापत झालेली नाही. कुणीही काळजी करु नका, आम्ही सगळे सुखरुप आहोत, असं गोगावले यांनी म्हटलं आहे.

Web Title: Accident to the car of this MLA from Shinde group

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here