Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: परतत असणाऱ्या वारकर्‍यांची पिकप पलटी होऊन अपघात, एक ठार, १०...

अहमदनगर ब्रेकिंग: परतत असणाऱ्या वारकर्‍यांची पिकप पलटी होऊन अपघात, एक ठार, १० ते १२ जखमी

Ahmednagar | Pathardi Accident: वारकर्‍यांची पिकअप गाडी खडीच्या ढिगारावरून जाऊन पलटी.

Accident due to reversal of pickup of returning Warkaris pathardi

अहमदनगर | पाथर्डी: पंढरपूरहून विठ्ठलाचे दर्शन घेऊन माघारी परतत असणाऱ्या पाथर्डी येथील वारकर्‍यांची पिकप पलटी होऊन अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात पाथर्डी येथील एक वारकरी मयत झाला असून १० ते १२ वारकरी जखमी झाले आहेत. यामध्ये तीन वारकरी गंभीर जखमी आहेत.

आष्टी तालुक्यातील  हाकेवाडी फाटा परिसरात हा अपघात रविवारी (दि.10) रात्री झाला आहे. रावण सखाराम गाढे (55, रा. धनगरवाडी, ता. पाथर्डी) असे मृत्यु झालेल्या वारकर्‍याचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाथर्डी तालुक्यातील धनगरवाडी येथील वारकरी हे श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेऊन पिकअप वाहनाने परत येत होते. रविवारी रात्री बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील हाकेवाडी फाट्यावर वारकर्‍यांची पिकअप गाडी खडीच्या ढिगारावरून जाऊन पलटी झाली. या अपघातात रावण गाडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर बंडू बाजीराव गाढे, हरी बबन चितळे, अशोक रावसाहेब चितळे, शोभा महादेव चितळे, गोरक्ष दादाबा गाढे, कोंडाबाई पंढरीनाथ गाढे, तुळशीराम नामदेव गाढे, सुधाकर भाऊ गाढे सर्व राहणार ( धनगरवाडी ता पाथर्डी) या जखमींना अहमदनगरच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच धनगरवाडीचे अशोक गाढे, मिठू चितळे, मच्छिंद्र चितळे, आजिनाथ गाढे, प्रकाश चितळे, भाऊ पवार, नारायण पवार आदींनी अपघातग्रस्तांसाठी मदत केली. माणिकदौंडीचे माजी पंचायत समिती सदस्य सुनील ओव्हळ यांनी या घटनेची माहिती आमदार मोनिका राजळे यांना देऊन राजळे यांच्या मदतीने अपघातग्रस्तांना सहकार्य केले. अपघातात मृत पावलेले रावण गाढे यांच्या वारसाला व अपघातात जखमी असलेले वारकरी यांच्या रुग्णालयाच्या खर्चासाठी राज्य सरकार कडून मदत होण्यासाठी आपण आमदार मोनिका राजळे यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे ओव्हळ म्हणाले.

Web Ttile: Accident due to reversal of pickup of returning Warkaris

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here