Home महाराष्ट्र पंढरपुरातील चंद्रभागा नदीत दोघे बुडाले

पंढरपुरातील चंद्रभागा नदीत दोघे बुडाले

Drowned in the Chandrabhaga river in Pandharpur- दोघेही नरखेड तालुक्यातील जलालखेडा व नारसिंगी येथील रहिवासी.

both drowned in the Chandrabhaga river in Pandharpur

जलालखेडा: आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी गेलेल्या तीन मित्रांपैकी दोघांचा पंढरपूर (जि. सोलापूर) येथील चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  दोघेही नरखेड तालुक्यातील जलालखेडा व नारसिंगी येथील रहिवासी असून, ते रविवारी सकाळी आंघोळ करण्यासाठी नदीत उतरले होते.

सचिन शिवाजी कुंभारे (२८, रा. जलालखेडा) व विजय सिद्धार्थ सरदार (२७, रा. नारसिंगी) अशी मृतांची नावे आहेत. ते रविवारी सकाळी पंढरपूरला पोहोचले. दर्शन करण्यापूर्वी ते चंद्रभागेत आंघोळ करण्यासाठी पात्रात उतरले.

सचिनला पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गेला आणि गटांगळ्या खाऊ लागला. त्याला वाचविण्यासाठी विजय पुढे सरसावला व तोही गटांगळ्या खाऊ लागला. नागरिकांनी दोघांनाही नदीतून बाहेर काढले व स्थानिक रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले. त्या दोघांनाही पोहता येत नव्हते. उत्तरीय तपासणीनंतर दोघांचेही मृतदेह त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले. सचिन हा एकुलता एक मुलगा असून, त्याला एक बहीण, तर विजयला एक भाऊ आहे.

Web Title: both drowned in the Chandrabhaga river in Pandharpur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here