Home अहमदनगर अहमदनगर: एकाच रात्री एक पतसंस्था, दोन दुकाने फोडली, लाखांचा ऐवज लंपास

अहमदनगर: एकाच रात्री एक पतसंस्था, दोन दुकाने फोडली, लाखांचा ऐवज लंपास

Shrigonda News Theft | श्रीगोंदा शहरातील प्रकार  साडेतीन लाखांचा ऐवज लंपास.

one night, a credit union broke into two shops and theft lakhs of rupees

Shrigonda | श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरातील साईसेवा पतसंस्था, सिद्धिविनायक मेडिकल, एक हार्डवेअरचे दुकान चोरट्यांनी फोडले. मेडिकलमधील साडेतीन लाखांची रोकड चोरांनी लंपास (Theft) केली. ही घटना रविवारी (दि. १०) मध्यरात्री घडली.

श्रीगोंदा बाजार समितीच्या गाळ्यांमधील साईसेवा पतसंस्था, एक स्पेअर स्पार्ट्सचे दुकान फोडण्याचा देखील चोरट्यांनी रात्री प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या पथकाने चोरी झालेल्या ठिकाणी भेट दिली.

श्रीगोंदा तालुक्यात घरफोड्या, दुकान फोडण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे. पोलिसांपुढे या चोऱ्यांचा तपास लावण्याचे आव्हान आहे. या प्रकारामुळे व्यापारी, व्यावसायिक हतबल झाले आहेत. बेलवंडीत चोऱ्यांचे सत्र सुरू आहे. आता हे सत्र श्रीगोंद्यातही सुरु झाले आहे.

Web Title: one night, a credit union broke into two shops and theft lakhs of rupees

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here