Home अहमदनगर Murder: पत्नीचा गळा आवळून खून, पती अटकेत, आत्महत्येचा केला बनाव

Murder: पत्नीचा गळा आवळून खून, पती अटकेत, आत्महत्येचा केला बनाव

Ahmednagar News | Rahuri Murder Case: न्यायालयातील याचिका मागे घेण्यास पत्ननीने कार दिला होतापत्नीचा खून केल्यानंतर तिला फाशी घेतलेल्या अवस्थेत घरात लटकवीले आणि पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव. 

Murder by strangling wife, husband arrested, commit suicideMurder by strangling wife, husband arrested, commit suicide

राहुरी: तालुक्यातील रेल्वे स्टेशन येथे पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना दिनांक ९ जुलै रोजी दुपारी उघडकीस आली. आरोपी पतीने पत्नीचा खून (Murder) केल्यानंतर तिला फाशी घेतलेल्या अवस्थेत घरात लटकवीले आणि पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव केला. याबाबत पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील रेल्वे स्टेशन येथील वैदुवाडी शिवारात दि. ९ जुलै रोजी सकाळी आरोपी पती इंद्रजीत जाधव याने पत्नी उज्ज्वला इंद्रजीत जाधव, वय २२ वर्षे हिने घरातील पत्र्याच्या अँगलला ओढणी बांधून आत्महत्या केली. असा बनाव केला होता. खासगी रुग्णवाहिकेला बोलावून पत्नीला दवाखान्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता राहुरी पोलिसांना माहिती समजली. पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील व परिविक्षाधीन उप निरीक्षक ज्योती डोके यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी इंद्रजीत जाधव याला ताब्यात घेतले.

याबाबत अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सांगितले कि, आरोपी इंद्रजीत जाधव याने पळून जाऊन उज्ज्वला हिच्याशी लग्न केले होते. मुलीच्या आईने राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे आरोपी दारू पिऊन पत्नीला मारहाण करीत होता. तुझ्या आईला केस मागे घ्यायला सांग, असा आग्रह करीत होता. परंतु मुलीच्या आईने न्यायालयातील याचिका मागे घेण्यास नकार दिला होता. या रागातून आरोपीने पत्नीचा गळा आवळून खून केला. नंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव केला असे प्रथमदर्शनी समोर येत आहे. मृत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी बंडु ऊर्फ इंद्रजीत रामदास जाधव याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Murder by strangling wife, husband arrested, commit suicide

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here