Home अहमदनगर ठाकरेंच्या शिवसेनेतील खा. सदाशिव लोखंडे सोडणार का साथ?

ठाकरेंच्या शिवसेनेतील खा. सदाशिव लोखंडे सोडणार का साथ?

Sadashiv Lokhande: खासदार सदाशिव लोखंडे   शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी उद्या सोमवारी चर्चा करून योग्य तो निर्णय घेणार.

Thackeray's Shiv Sena. Why Sadashiv Lokhande will leave

शिर्डी | Shirdi: शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे हे ठाकरेंची साथ सोडणार का ? ते नेमकी कोणती राजकीय भूमिका घेणार याबाबत  चर्चेला उधाण आले आहे. राज्यातील शिवेसेनेचे अनेक आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहे. त्यापाठोपाठ खासदारही शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याची भाषा बोलू लागले आहे.

याबाबत शिर्डीत पत्रकारांनी खासदार सदाशिव लोखंडे यांना विचारले असता  शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी उद्या सोमवारी चर्चा करून योग्य तो निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

ते म्हणाले, आपण आतापर्यंत काँगेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधी लढलो आहोत, त्यामुळे भाजपाशी युती करावी अशी मागणी खासदारांची होती. आपण शिर्डी मतदारसंघात शिवसेना आणि भाजपाच्या मदतीने निवडून आल्याचे सांगितले.

सदाशिव लोखंडे हे कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघातून तीन वेळा भाजपचे आमदार राहिले आहेत. तरूणपणापासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चेंबूर शाखेत सक्रिय होते. भाजपचे नेते दिवंगत प्रमोद महाजन यांचे ते समर्थक होते. कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघातील आरक्षण निघाल्यावर तेथून मात्र त्यांनी निवडणूक लढविली नाही. युतीच्या काळात 2014 व 2019 च्या लोकसभा निवडणुकीत लोखंडे हे शिवसेनेच्या तिकीटावर खासदार झाले.

Web Title: Thackeray’s Shiv Sena. Why Sadashiv Lokhande will leave

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here