Home अकोले निळवंडे ५० टक्के भरले तर भंडारदरा धरण इतके टक्के भरले

निळवंडे ५० टक्के भरले तर भंडारदरा धरण इतके टक्के भरले

Bhandardara Dam and Nilwande Dam: निळवंडे काल सायंकाळपर्यंत ५० टक्के क्षमतेने भरले आहे. तर भंडारदरा धरण ४४ टक्के 

Bhandardara Dam and Nilwande Dam Today

भंडारदरा: भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगलाच जोर धरल्याने डोंगर दरी खोऱ्यातून वाहणारे धबधबे अक्राळविक्राळ रूप घेतले आहे. धो धो पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सगळीकडे गारवा पसरला आहे.  निळवंडे काल सायंकाळपर्यंत ५० टक्के क्षमतेने भरले आहे. तर भंडारदरा धरण ४४ टक्के इतके झाले आहे.

8330 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल रविवारी सायंकाळी 4138 दलघफू (49.73टक्के) झाला होता. त्यानंतर रात्री या धरणातील पाणीसाठा निम्म्याच्या पुढे सरकला होता. तर 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरातील पाणीसाठा सायंकाळी 4847 दलघफू (44 टक्के) झाला आहे. दोन दिवसांत भंडारदरा ५० टक्के भरण्याची शक्यता आहे.

पाणलोटात सहाव्या दिवशी धो-धो पाऊस सुरू असल्याने गत 24 तासांत निळवंडे धरणात 417 दलघफू तर भंडारदरार 760 नव्याने दलघफू पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे निळवंडेतील पाणीसाठा 4138 (49.73टक्के) झाला होता. त्यानंतर रात्री 9 वाजण्याच्या सुमारास धरणातील पाणीसाठा निम्मा झाला होता. भंडारदरात काल दिवसभर पडणार्‍या पावसाची नोंद 22 मिमी झाली आहे.

अकोले तालुक्यातील कृष्णावंती नदीवरील लघु पाटबंधारे तलाव वाकी काल शनिवारी दुपारी 1 वाजता पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे ओव्हरफ्लो झाल्याने निळवंडे धरणात नवीन पाण्याची आवक वाढली आहे. वाकीतून 789 क्युसेकने तसेच अन्य ओढे नाले भरभरून वाहत असल्याने तासागणिक या धरणातील पाणीसाठा वाढत आहे.

पडलेला पाऊस (मिमीमध्ये)

भंडारदरा – 209, घाटघर – 230, पांजरे – 00, रतनवाडी- 229, वाकी – 167

Web Title: Bhandardara Dam and Nilwande Dam Today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here