Home Accident News Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Kopargaon Accident Two Wheeler one Death

कोपरगाव | Accident News: कोपरगाव संगमनेर रस्त्यावर अंजनापूर शिवारात हॉटेल मनोदीपजवळ दुचाकीवरून माहेरी गेलेल्या पत्नीस सासरी आणण्यासाठी जात असणाऱ्या पतीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.

सोपान मंगल पवार वय ३५ रा. कोळपेवाडी ता. कोपरगाव असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

मयत सोपान पवार हा संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे आपल्या पत्नीला आणण्यासाठी जात होता. अंजनापूर शिवारात हॉटेल मनोदीप नजीकच्या वळणावर रात्री ९ वाजता अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सोपान हे जागीच ठार झाले. धडक दिलेले वाहन पसार झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालक याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Kopargaon Accident Two Wheeler one Death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here