Home अहमदनगर शेतीच्या वादातून दोन भावांत भांडण, कुऱ्हाडीने वार

शेतीच्या वादातून दोन भावांत भांडण, कुऱ्हाडीने वार

Rahuri quarrel between two brothers over an agricultural dispute

राहुरी | Rahuri:  राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे शेतीच्या बांधावरून दोन चुलत भावात भांडणातून तरुणावर कुऱ्हाडीचा वार केल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. प्रशांत गागरे असे या तरुणाचे नाव आहे.

प्रशांत यास तातडीने लोणी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रशांत शिवाजी गागरे वय ३२ हा आपल्या कुटुंबांसोबत ताभेरे येथील दत्त मंदिराजवळ राहतात. त्यांची तांभेरे ग्रामपंचायत हद्दीत शेती असून त्याच्या चुलत भावाशी शेतीच्या बांधावरून वाद आहेत.

प्रशांत गागरे हा असतना शेतीचा बांध सरकला या कारणावरून त्याचा चुलत भाऊ राधेश्याम गागरे हा प्रशांतच्या आईला म्हणाला की, तुम्ही जास्त माजले आहेत. तुमचा बेत पाहतो. असे म्हणून त्याने कुऱ्हाडचा दांडा कडून प्रशांतच्या पाठीत मारला. वार वाचविताना प्रशांत याच्या तळ हातावर वार लागला. यावेळी प्रशांतचा भाऊ अविनाश याने लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचारासाठी प्रशांतला दाखल केले. उपचार सुरु असताना पोलिसांना रुग्णालयात पप्रशांत ने जबाब दिल्याने मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.  

Web Title: Rahuri quarrel between two brothers over an agricultural dispute

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here