Home संगमनेर संगमनेर तालुक्यातील या मंगल कार्यालयावर कारवाई, २० हजारांचा दंड

संगमनेर तालुक्यातील या मंगल कार्यालयावर कारवाई, २० हजारांचा दंड

Action on this Mangal karyalaya in Sangamner taluka

संगमनेर | Sangamner: अहमदनगर जिल्ह्यात कोविड १९ च्या वाढत्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी कार्यक्रमांवर निर्बंध घातले असताना देखील कार्यक्रमात नियमांची पायमल्ली केली जात आहे. करोनाची दुसरी लाटेचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आदेश काढले आहे.

यानुसार कार्यक्रम व समारंभात पन्नास पेक्षा कमी लोकांची उपस्थिती असावी असे जाहीर केले आहे. अशा सोहळ्यांत संखेपेक्षा जास्त उपस्थिती नसावी अन्यथा कार्यालय मालकावर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आलेले आहे.

यासाठी जिल्ह्यात कडक मोहीम राबविली जात आहे. त्यानुसार संगमनेर उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम व गट विकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी तपासणी मोहीम राबविली आहे. त्यांनी अचानक घुलेवाडी येथील अमृता लोन्स येथे एका विवाह सोहळ्यात भेट दिल्याने त्यांना तेथे नियमांची पायमल्ली झाल्याचे आढळून आले. नियमापेक्षा अधिक नागरिक व मुखपट्टी नसलेले नागरिक आढळून आले तर सामाजिक अंतराची तर फज्जा उडविला होता. या कारणामुळे अमृता लोन्सच्या मालकावर २० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने तालुक्यात खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या हितासाठी अशा प्रकारच्या कारवाईचा बडगा प्रशासनाने हाती घेतला आहे.  

Web Title: Action on this Mangal karyalaya in Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here