Home अहमदनगर नगर औरंगाबाद महामार्गावर कार व ट्रॅव्हल यांच्यात भीषण अपघात, पाच जागीच ठार

नगर औरंगाबाद महामार्गावर कार व ट्रॅव्हल यांच्यात भीषण अपघात, पाच जागीच ठार

Nevasa accident between car and travel on Nagar Aurangabad highway

नेवासा | Nevasa: नगर औरंगाबाद महामार्गावर देवगड फाटा जवळ स्विफ्ट कार व ट्रॅव्हल यांच्यात भीषण अपघात सोमवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास घडला. या दुर्दैवी अपघातात पाच जण जागीच मृत्यू झाले आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अहमदनगर कडून औरंगाबादकडे जात असलेल्या ट्रॅव्हल बस व औरंगाबाद कडून नगरच्या दिशेने जात असलेल्या स्विफ्ट कार यांच्यामध्ये सोमवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास देवगड फाट्याजवळ भीषण अपघात घडला. या अपघातात कार मधील पाच जण जागीच ठार झाले आहेत. मयत व्यक्ती या जालना जिल्ह्यातील असल्याचे समजते. समोरासमोर हा अपघात घडल्याने स्विफ्ट कारचा चक्काचूर झाला आहे.

या अपघाताची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, पोलीस नाईक अशोक नागरगोजे यांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना ग्रामीण रुग्णालयात हलवले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अधिक कार्यवाही नेवासा पोलीस करीत आहे.  

Web Title: Nevasa accident between car and travel on Nagar Aurangabad highway

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here