Home अहमदनगर सावत्र दिराचा भावजयीवर अत्याचाराचा प्रयत्न

सावत्र दिराचा भावजयीवर अत्याचाराचा प्रयत्न

Kopargaon Attempt to torture brother-in-law's brother-in-law

कोपरगाव | Kopargaon: कोपरगाव तालुक्यातील एका गावातील महिलेला सावत्र दिरांनी दमदाटी करून शिवीगाळ करत अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला घराशेजारील आपल्या शेतात पाणी भरीत असताना दोन सावत्र दिरांनी पाणी देण्याच्या कारणावरून वाद घालून भावाजायीस शिवीगाळ व दमदाटी करत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली असून फिर्यादीवरून दोन्ही सावत्र दिराविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले हे करीत आहे.

Web Title: Kopargaon Attempt to torture brother-in-law’s brother-in-law

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here