Home क्राईम संगमनेर: लग्नाचे आमिष दाखवून सात वर्षापासून तरुणीवर अत्याचार

संगमनेर: लग्नाचे आमिष दाखवून सात वर्षापासून तरुणीवर अत्याचार

Sangamner Atrocities on young women for seven years 

संगमनेर: लग्नाचे आमिष दाखवत युवतीवर सात वर्षापासून होत असलेल्या अत्याचाराची घटना समोर आली आहे. या युवतीवर अत्याचार करणारा तरुण, तरुणाचे वडील, भावजयी अशा तिघांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पुणे येथील चाकण व संगमनेर शहरातील एका नगरात या युवतीवर अत्याचार करण्यात आले. याप्रकरणी पिडीत युवतीने शुक्रवारी फिर्याद दिली असून त्यावरून पोलिसांनी प्रवीण गोरख नवले, गोरख गंगा नवले व रुपाली रामदास नवले सर्व रा. मालदाड रोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२४ वर्षीय पिडीत तरुणी ही संगमनेर शहरात राहते. प्रवीण नवले या तरुणाशी काही वर्षापूर्वी या तरुणीची भेट झाली. त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले. प्रवीण नवले याने खराबवाडी ता. चाकण व संगमनेर शहरात एका नगरात २०१४ पासून ते १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत तरुणीवर अत्याचार केले.  या पिडीत तरुणीला गोरख नवले व रुपाली नवले यांनी मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे,

या प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी हे करीत आहे.  

Web Title: Sangamner Atrocities on young women for seven years 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here