Home कोपरगाव भाऊबिजेस माहेरी गेलेली विवाहिता उशिरा आल्याने मारहाण

भाऊबिजेस माहेरी गेलेली विवाहिता उशिरा आल्याने मारहाण

Kopargaon Husband beaten up for being late

कोपरगाव | Kopargaon: भाऊबिजेला गेलेली विवाहित ही माहेरून उशिरा सासरी आल्याने याचा मनात राग धरून तिला सासू, सासरे, पती, नणंद यांनी शिवीगाळ वा मारहाण केल्याची घटना २२ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारस घडली.

तिच्या पोटात लाथा मारल्याने तिच्या पोटातील बाळाचा गर्भपात झाला. याबाबत कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील हिंगणी येथील सुरेखा अनिल गंगावणे वय १९ हिने फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीमहिला हिचे माहेर हे पोहेगाव ता. कोपरगाव हे आहे. तिचे काही महिन्यांपूर्वी हिंगणी येथील अनिल गंगावणे या तरुणाशी लग्न झाले होते. ती भाऊबीजेला आपल्या पोहेगाव येथील माहेरी नवरा व सासू यांना विचारून गेली होती. मात्र तिला येताना काही कारणामुळे सासरी येण्यास उशीर झाला. याचाच मनात राग धरून तिचा पती अनिल गंगावणे, सासू मुक्ताबाई उत्तम गंगावणे, सासरा उत्तम रंगनाथ गंगावणे, नणंद स्वाती दिपक इंगळे सर्व रा. हिंगणी या सासरच्या मंडळीने सुरेखा हिला २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास मारहाण करून शिवीगाळ केली. या मारहाणीत पोटात लाथा मारल्याने तिला अति वेदन होऊन तिचा गर्भपात झाला. तिला अगोदर सरकारी व नंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. काल कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Kopargaon Husband beaten up for being late

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here