Home श्रीगोंदा मुलीला छेडछाड करण्यापासून रोखल्यामुळे माजी सभापतीच्या कुटुंबाला मारहाण

मुलीला छेडछाड करण्यापासून रोखल्यामुळे माजी सभापतीच्या कुटुंबाला मारहाण

Shrigonda family beaten for preventing girl from being molested

श्रीगोंदा | Shrigonda: अल्पवयीन मुलींची छेडछाड करीत असताना त्यांना रोखल्यामुळे आरोपींनी चिडून श्रीगोंदा पंचायत समितीचे माजी सभापती शहाजी हिरवे यांच्या घरावर हल्ला चढवत पत्नी व इतर महिला यांना मारहाण करण्यात आली. तसेच घरातील रोख रक्कम व मंगळसूत्र त्यांनी चोरून नेले.

याबाबत मनीषा शहाजी हिरवे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीच्या घराजवळ एक गरीब कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत आहे. त्यांच्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीला तरुण छेडछाड करून त्रास देत असताना फिर्यादीच्या मुलाने या तरुणांना दोन दिवसांपूर्वी समज देण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यात वादावादी झाली. मनीषा हिरवे यांनी फिर्यादीत म्हंटले आहे, या प्रसंगाचा राग येऊन विजय पांडुरंग कुसाळकर, पांडुरंग बाळू कुसाळकर, रोहित जालिंदर कुसाळकर, विलास भोजू कुसाळकर, जालिंदर सखाराम कुसाळकर, रवी लालासाहेब कुसाळकर, नितीन बाबासाहेब कुसाळकर, योगेश बाबसाहेब कुसाळकर, बाबासाहेब कुसाळकर, भरत कुसाळकर यातील काही आरोपीविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात याअगोदर गुन्हा दाखल असल्याची माहिती समजली. काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत सदस्यास मारहाण केल्याची घटना घडली आहे. सुरज कुसाळकर, आणि पप्पू लष्करे हे आमच्या घरी मोटारसायकलवरून घरी आले व तुमचा मुलगा कोठे आहे असे विचारले. घरात कोणीच नसल्याचा सांगितल्याने राग येऊन शिवीगाळ व दमदाटी केली.

घरात शिरून मुलगा अनिकेत आहे का? त्यावेळी घरात शिरण्यास प्रतिबंध केला असता त्यांनी धक्काबुकी केली. तसेच गळ्यातील अडीच तोळे वजनाचे गंठन तोडून नेले. कपाटातील ५० हजार रुपये काढून नेले. धक्काबुकी व शिवीगाळ केली.

हा सर्व प्रकार घडल्याने या आरोपींनी गावातून जोरजोरात होर्न वाजवून दहशत निर्माण केली असे फिर्यादीत म्हंटले आहे.     

Web Title: Shrigonda family beaten for preventing girl from being molested   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here