Home अकोले अकोले तालुक्यातील घटना: बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू

अकोले तालुक्यातील घटना: बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू

Akole Taluka Bibatya death in well

अकोले | Akole: शिकारीच्या मागे लागलेला बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील आंबड परिसरातील मुक्ताईवाडी येथे आज घडली.

गवराम वाळीबा जाधव हे आपल्या विहिरीवर विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना हा बिबट्या विहिरीच्या पाण्यावर मृत अवस्थेत तरंगताना आढळून आला.त्यांनी सरपंच दत्तू जाधव यांना माहिती दिली.त्यानंतर वनपाल व्ही.एन.पारधी यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांच्या मदतीने मृत बिबट्यास विहिरीबाहेर काढण्यात आला.सदरील बिबट्या हा मादी बिबट्या होती ती 2 ते अडीच वर्षांची होती.शिकारीच्या मागे लागताना हा बिबट्या विहिरीत पडला असावा असा अंदाज वनरक्षक ज्ञानेश्वर कोरडे यांनी व्यक्त केला.वन विभागाच्या सुगाव येथील नर्सरीत या बिबट्याचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.भांगरे यांनी शवविच्छेदन केले.या नंतर शासकीय नियमानुसार या बिबट्याचा अंत्यविधी करण्यात आला.

Web Title: Akole Taluka Bibatya death in well

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here