डॉ. शीतल आमटे यांनी विषारी इंजेक्शन घेऊन केली आत्महत्या
चंद्रपूर: डॉ. बाबा आमटे यांची नात व डॉ. विकास आमटे यांची मुलगी आणि महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे करजगी यांनी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज घडली आहे.
अलीकडेच त्यांनी आमटे कुटुंबातील सदस्यांवर आरोप केले होते. त्यावर आमटे कुटुंबीयांनी शीतल आमटे हिचे मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्याचे निवेदन जारी केले होते.
गेल्या अनेक दशकापासून आनंदवनशी जोडलेल्या राज्यातील अनेक कलावंतानी आमटे कुटुंबियांशी चर्चा करून कौटुंबिक कलह संपावेत यासाठी प्रयत्न केले होते.
विकास आणि साधना आमटे यांच्यानंतर आनंदवनची सूत्रे त्यांचे सुपुत्र विकास आमटे यांच्याकडे देण्यात आली होती. काही काळ कारभार पाहिल्यानंतर त्यांचा मुलगा कौस्तुक यांची महारोगी समितीवर नियुक्ती केली. मुलगी शीतल आमटे करजगी यांना या समितीवर स्थान दिले गेले होते. आमटे कुटुंबातील वादामुळे मुलाचा कारभार काढून मुलीला सोपविल्याच्या चर्चा आहेत.
Web Title: Dr Sheetal Amte suicide