Home Accident News Accident: मालट्रक उलटवित अपघात करून पेटवून दिला

Accident: मालट्रक उलटवित अपघात करून पेटवून दिला

Kopargaon truck overturned and caught fire

Ahmednagar News Live | Kopargaon | कोपरगाव:  ट्रक चालकाने भरधाव वेगाने ट्रक चालवत अपघात (Accident) केला आणि ट्रक रोडच्या कडेला गेल्यावर पेटवून देऊन गाडीचे नुकसान केल्याचा प्रकार तालुक्यातील संवत्सर येथील गोदावरी नदीजवळ घडला.

लोखंडी पाईप घेऊन जाणारा ट्रक (क्रं . एम.एच. 20 सी. टी. 2355) भरधाव वेगाने चालवून चालक किसन साहेबराव वाघ याने अपघात केला. तसेच गाडी रोडचे खाली गेल्यावर आग लावून दिल्याप्रकरणी  प्रकरणी आरोपी चालकाविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत नाशिक येथील फिर्यादी मालक बाळासाहेब बारकू गांगुर्डे (वय-49) यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की,  आरोपी चालक किसन आपल्या ताब्यातील (क्रं . एम.एच. 20 सी. टी. 2355) क्रमांकाचा टाटा ट्रक हा पाईपने भरलेला होता . तो घेऊन सिन्नर वरून औरंगाबादच्या दिशेने मध्यरात्री नंतर पावणे दोनच्या सुमारास घेऊन जात असताना संवत्सर शिवारात रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवून त्याच्या ताब्यातील वरील क्रमांकाचा टाटा कंपनीचा बारा चाकी लोखंडी पाईपचा ट्रक उलटविला व ट्रक रोडचे खाली नेऊन तिला आग लावून गाडीचे नुकसान केले आहे.

याबाबत आरोपी चालकाविरुध्द भा.दं.वि. कलम 27 9 , 427 , व मोटार वाहन कायदा कलम 184 , 177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, पो.हे.कॉ.आर.पी.पुंड आदींनी घटनास्थळी भेट दिली. अधिक  तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. पुंड हे करीत आहेत .

Web Title: Kopargaon truck overturned and caught fire

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here